Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

पोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभर बैल शेतात राबराब राबतात म्हणूनच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांना कामापासून सूट्टी देऊन त्यांच्यावर रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते व खुप उत्साहाने हा सण साजरा केला जातो. हीच प्राण्यांविषयीची कृतज्ञता व वर्षभर शेतात राबणा-या बैलाचे महत्व समजावे, त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची त्यांना ओळख व्हावी याकरीता चांदा पब्लिक स्कूल येथे नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुरज गुंडावार, सौ. योगिता गुंडावार व सौ. आरती नरमशेट्टीवार लाभले. स्पर्धेत मुलांनी आपल्या नंदीची उत्कृष्ठ प्रकारे सजावट करून त्यातून त्यांनी मार्गदर्शनपर संदेशही देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत सर्व चिमुकल्यांनी शेतक-याची वेशभुषा केली असून यात पालकांचा उत्साह त्यांनी केलेल्या नंदीच्या सजावटीतून दिसत होता.

चांदा पब्लिक स्कूलच्या संचालीका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले व मुलांना मुक प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी मुलांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करणा-या पालकांचे अभिनंदन केले.
ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनीषा नागोशे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका रिना शाहा यांनी केले. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये