ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहन कर्ज उपलब्ध करून ब्रह्मपुरी अर्बन को-ऑपरेटिव बँकने नंदू गुड्डेवार यांचे स्वप्न केले साकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- काही वर्षा पूर्वी ट्रॅव्हल्स बुकिंग एजंट म्हणून सुरू केलेल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर ब्रम्हपुरीतील नंदकिशोर विठ्ठलराव गुड्डेवार यांनी गगनभरारी घेत शहरात प्रथमच नवी कोरी ट्रॅव्हलचे मालक बनून एक आदर्श निर्माण केला आहे.शहरातील ब्रम्हपुरी अर्बन को ऑप बँकेने कर्ज उपलब्ध करून देत नंदकिशोर गुड्डेवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.

आज दिनाक 13/09/2023 ला ब्रम्हपुरी अर्बन को ऑप बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा अतुल देशकर आणि नंदकिशोर गुड्डेवार यांचे वडील माजी ज्येष्ठ सेवादल संघटक विठ्ठलराव गुड्डेवार यांचे हस्ते नव्या ट्रॅव्हलचे पूजन करण्यात आले.या वेळी बँकेचे कर्मचारी व शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये