ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व पूर्व बीएसपी नेते अतुल भैसारे यांचा अनेक कार्यकर्त्यांसोबत आम आदमी पार्टी मध्ये जाहिर पक्ष प्रवेश

दिल्लीचे खा. संजय सिंह यांची उपस्थिती ; आम आदमी पार्टी ची भव्य महासंकल्प सभा पुणे येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे भव्य महासंकल्प सभा पुणे इथे घेण्यात आले. या वेळी दिल्लीचे राज्यसभा खासदार संसदेची बुलंद तोफ मा. संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रा चे प्रभारी गोपाल भाई इटालिया यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.

हजारोंच्या संख्येने कार्यक्रमात कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अरविंद केजरीवाल यांच्या विचाराने प्रेरित होऊन व दिल्लीत होणारे शिक्षा, स्वास्थ, बिजली, पाणी यावर काम बघून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व पूर्व बीएसपी नेते अतुल भाऊ भैसारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत राज्य संघटन सचिव भूषणजी ढाकुलकर व चंद्रपुर जिल्हाअध्यक्ष मयुर भाऊ राईकवार यांच्या प्रमुख उपस्थित मा. खासदार संजय सिंग यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले.

बाबासाहेबांच्या संविधानावर आज कोणी इमानदारी ने काम करुन दाखवत असेल तर ते फक़्त दिल्ली चे मुख्यमंत्री मा.श्री. अरविंद जी केजरीवाल यांनीच करुन दाखवत आहे. म्हणून मी पक्ष प्रवेश करत आहो असे अतुल भाऊ भैसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी भद्रावतीचे शहर अध्यक्ष सुरजभाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये