रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
मा. रामदासजी तडस, सदस्य, लोकसभा वर्धा मतदार संघ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा याच्या मार्फत दिनांक १५.०१.२०२४ ते १४.०२.२०२४ या कालावधीत वर्धा जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा अभियाचा उद्घाटन समारंभ न्यु आर्टस, कॉर्मस कॉलेज, धुनिवाले मठाजवळ, येथे दिनांक १५.०१.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. रामदासजी तडस, सदस्य, लोकसभा वर्धा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नरेंन्द्र फुलझेले, अतिरिक्त जिल्हाधिकारी, वर्धा. सतिश अंभोरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा तसेच मा. विवेक देशमुख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत दिनांक १५.०१.२०२४ ते १४.०२.२०२४ या कालावधीत रस्ता विषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मो. समीर मो. याकुब, यांनी सांगीतले. या कार्यक्रमास न्यु आर्टस, कॉर्मस विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, मेघल अनासाने, मोटार वाहन निरिक्षक, यांनी केले. तसेच उपस्थिताचे आभार अक्षय मालवे, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक, यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरिक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक, यांनी परिश्रम घेतले.
 
					 
					 
					 
					 
					


