ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्वी तालुक्यातील बोरगांव घाटामध्ये अज्ञात मुलीचा आढळला मृतदेह

सदर प्रकरणाचे कारण अद्याप अस्पष्ट ; पुढील तपास सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आर्वी तहसील मध्ये बोरगाव घाटामध्ये अज्ञात मुलीचा मृतदेह झाडावर फाशी लागून असलेल्या स्थितीत आढळून आल्याने आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अनोळखी मुलीची फाशी लावून आत्महत्या की हत्या? अद्याप कारण अस्पष्ट आहे. या मुलीची अजून पर्यंत ओळख पटलेली नसून पोलिसांना तपास करण्याकरीता अवघड होत आहे हा मृतदेह कोणाचा आहे या गोष्टीचा तपास आर्वी तहसीलचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री खंडेराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री भानुदास पिटुरकर आणि पोलिस कर्मचारी करीत आहेत संबधित मुलीची ओळख  पटताच या गोष्टीची माहिती गुरूदेव घोडणारे सरपंच बोरगांव यांना किंवा पोलिस स्टेशन आर्वी येथे संपर्क साधावा अशी माहिती पोलिस स्टेशन आर्वी यांनी दिलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये