Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीच्या पायलने पॉवरलिफ्टींग स्पर्ध्यमधे ३ गोल्ड मेडल पटकाविले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

धुळे पॉवरलिफ्टींग असोशीएशन व A L S फिटनेस,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग, पॉवर स्काड , बेंच प्रेस , डेडलिप्ट म्पियन स्पर्ध्य २०२४ घेण्यात आली होती.ब्रम्हपुरी शहरातील पायल लालजी नागरे हीने पॉवरलिफ्टींग स्पर्धा ज्युनियर,५८की गटात सहभाग घेतला त्पॉवरलिफ्टींग स्पर्ध्यमधे स्पर्धेत ब्रम्हपुरी च्या पायल नागरे हिने ३ गोल्ड मेडल पटकावून प्रथम स्थान प्राप्त केले.

तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ज्युनिअर Strongest girl of Maharashtra State 2024 व ओपन बेंच प्रेस या सिंगल इव्हेंट मध्ये opne bench press super women of Maharashtra State 2024 असे दोन टायटल प्राप्त केलेले आहेत.

झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत वेट पायल नागरे हिला सन्मान चिन्ह गोल्ड मेडल तसेच दोन टायटल प्रदान केले गेले. पायल हिच्या घवघवीत यशाने क्रीडा क्षेत्रात ब्रम्हपुरीचे नाव गौरवाने घेतल्या जात असून पायल जिम ट्रेनर म्हणून काम करीत आहे.आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल आवळे चंद्रपूर तसेच आई वडील यांना दिले आहे. तिच्या उतुंग कामगिरी मुळे तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये