ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बंधूभाऊंचे महावितरणला धन्यवाद! मिळाली अवघ्या २४ तासात नविन वीज जोडणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर विभागांतर्गत मूल उपविभागातील,   बंडू सखाराम श्रिकोंडवार यांनी, कपडे इस्त्रीच्या मेहनतीतून स्वतःचे  छोटेसे घर उभे केले व या घरात प्रकाश खेळावा यासाठी महावितरण कडे अर्ज केला.अर्ज केल्यापासून २४ तासाचे आत बंडू भाऊच्या घरी प्रकाश पोहोचवून महावितरणनेही त्यांना सुखद धक्का दिला.

सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने त्यांना अवघ्या २४ तासात ही नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत.

या माहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडण्या देण्यात येत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुक सेवा देण्याची सुचना केली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत सर्व अधिकारी व अभियंता यांना ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा तत्परतेने देण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर परिमंडल अंतर्गत ग्राहकांना वीज जोडण्या तसेच ग्राहकांच्या विविध तक्रारींचे वेळेत निरासन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

 मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे.

 याच मोहिमेचा भाग म्हणून आज दि. १७.०८.२०२३ रोजी  मुख्य अभियंता सुनील देशपांडे चंद्रपूर परिमंडळ व अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, चंद्रपूर प्रविभाग यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राहक बंडू सखाराम श्रिकोंडवार या ग्राहकास अर्ज केल्यापासून २४ तासाचे आत नवीन वीज जोडणी देण्यात आली. चंद्रपूर परिमंडळात,सद्दस्थितीत पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या संपुर्ण ग्राहकांच्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

 मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडल यांनी मूलचे उपविभाग   उपकार्यकारी अभियंता चंदन चौरासिया व संपूर्ण चमू- सहाय्यक अभियंता पंकज उजवणे,  जनमित्र श्री प्रफुल कुंभारे वरिष्ठ तंत्रज्ञ ,यांचे  अभिनंदन केले आहे.

जनसंपर्क अधिकारी, महावितरण, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये