Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील घरफोडीतील आरोपीस अटक

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची कार्यवाही ; 2 लाख 63 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12/12/2024 रोजी फिर्यादी नामें गणपत हिरामण चाफले रा. मौजा बुरकुणी ता.हिगणघाट यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे रिपोर्ट दिला, कि त्यांच्या मौजा बुरकोणी येथील राहत्या घरातील कपाटातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने दोन सोन्याच्या मंगळसूत्र व मनी असलेल्या पोथी, व चांदीच्या चुड्या जोडवे असे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून समांतर तपास करीत असताना दिनांक 13/12/2024 रोज स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या पथकाला माहिती मिळाली कि एक इसम लाल रंगाच्या दुपट्टा बांधून मोटार सायकलने हिंगणघाट येथील रेल्वे स्टेशन परिसरात सोन्या चांदी चे दागिने विकण्यासाठी आला आहे अशा माहितीवरून त्यास ताब्यात घेऊन त्याची पोलिसांनी कसुन विचारपूस केली असता. त्यांनी त्याचे नाव विशाल रमेश चापले वय 26 वर्ष रा मौजा बुरकुणी ता. हिंगणघाट असे सांगितले त्याच्या ताब्यातून एक सोन्याचे मनी व पदक असलेली 6 ग्रॅम वजनाची पोथ ,एक सोन्याचे मनी व पदक असलेली 25 ग्रॅम वजनाची पोथ, दोन सोन्याचे कानातील स्टोप्स 2.140 ग्रॅम वजनाचे, दोन चांदीचे पायातील तोरडे अंदाजे वजन 61.400 ग्रॅम, एक चांदीचे कमरआकडा 18.600 ग्रॅम, दोन चांदीचे जोडवे व एक लहान जीवती 13 ग्रॅम, आरोपीने गुन्ह्यात वापरलेली चोरीचा मोटार सायकल असा एकूण जुमला किंमत 2,63,200 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीस पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या ताब्यात दिले असून सदर गुन्ह्यात अधिक आरोपी असण्याची शक्यता आहे तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, पोउनि उमाकांत राठोड,प्रकाश लसुंदे, सलाम कुरेशी, राहुल इटेकर पोलीस आमलदार राजेश तिवसकर रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये