ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लालगुडा येथे श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना पंचायत समिती अंतर्गत गडचांदूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी यांच्या संयुक्त श्रमदानातून गावालगत असलेल्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

         अवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी नाला किंवा ओढ्यातून वाहून जाते, भूजल पातळी ही खालावत चालल्याने अशात रब्बी हंगामातील पिकांना उपयुक्त पाणी मिळत नाही. त्यामुळे” पाणी आडवा, पाणी जिरवा” या उपक्रमा अंतर्गत गावाच्या नाल्यावर गावकरी आणि शाळेच्या पुढाकाराने श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. या वनराई बंधाऱ्यामुळे पक्ष्यांच्या चिव चिवाटा बरोबरच गावातील पाळीव प्राणी यांच्यासाठी लाखमोलाचा ठरणार आहे.

      हा वनराई बंधारा बांधण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे,सहाय्यक शिक्षक गोविंद पेदेवाड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे,शाळेचे विद्यार्थी तथा इतर गावकरी मंडळी यांनी श्रमदान केले.

         अशाप्रकारचे बंधारे बांधून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे,असे एक उदाहरण गेली सहा वर्षांपासून ठेवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये