Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा

ढोल - ताशे व डीजेच्या निनादात निघाली भव्य शोभा यात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

201 जोडप्यांच्या हस्ते महा आरती : विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

    भद्रावती येथील श्री गणेश दत्त गुरु पंचायतन मंदिरात दिनांक 14 ला श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सायंकाळी पाच वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून श्री गुरुदत्त पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच सकाळी मंदिरात श्री दत्त यागचे आयोजन करण्यात आले. दुपारी बारा वाजता श्री दत्त जन्म सोहळा पार पडला,यानंतर 201 जोडप्यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली. त्यानंतर ह भ प सौ संगीताताई किशोर गलांडे यांच्या दत्तजन्म कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता मंदिरातून श्री दत्त पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल – ताशे व डीजेच्या निनादात निघालेल्या या शोभायात्रेत शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभायात्रा मुख्य रस्त्याने फिरून परत मंदिरात आल्यानंतर तिची सांगता करण्यात आली. त्यानंतर गोपालकाल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वितरण करून सदर सोहळ्याची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये