ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची मैत्रेय ने केली फसवणूक

लाडक्या भावाने मुख्यमंत्रीपदाचा विधायक वापर करून अन्याय दूर करावा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

मुख्यमंत्र्याच्या विदर्भातील शेकडो लाडक्या बहिणींची मैत्रेय कंपनी कडून फसवणूक झाली असून आम्हाला आमचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी आज दिनाक 10 जुलै 2024 रोजी राजुरा तालुका पत्रकार संघाचे कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन लाडक्या बहिणींनी केली आहे.

मैत्रेय कंपनी मध्ये अभिकर्ता म्हणून कार्य करणाऱ्या शिला टाले, सुमित्रा कुचनकर, कल्पना कापसे, माया नमुरवार, मीना उपाध्ये व सुनील सहारे यांच्या नेतृत्वात आज पंचवीस महिलांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील 227 करोड गुंतवणूकदारांनी 2 हजार 800 करोड गुंतवणूक केली होती. मात्र कंपनीने मुदत पुर्ण होऊनही गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाही. काही ग्राहकांना धनादेश देण्यात आले मात्र ते वटण्यापूर्वीच कंपनीने गाशा गुंडाळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अजुनही अडकले असुन कुणी मुलीचे लग्न तर कुणी उच्च शिक्षण तर कुणी इतर काही करण्यासाठी गाठीला पैसे असावे ह्यासाठी ही गुंतवणुक केली होती मात्र मुद्दल देखिल परत मिळत नसल्याने लाखो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने कंपनीच्या 800 कोटी रुपयांच्या जवळपास 375 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहे. परंतु मुंबई शहर सत्र न्यायालयाने आवश्यक ती परवानगी दिली नसल्याने त्या मालमत्तांची शासन विक्री करू शकत नसल्याने गुंतवणूकदारांची घामाची कमाई अजुनही अधांतरी अडकली असल्याने आपले संसार उध्वस्त झाले आहे अशी भावना लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे.

2009 मध्ये कंपनी बंद झाली. मागील पंधरा वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या आम्हा सर्व लाडक्या बहिणींची लाडक्या भावाला आर्त हाक आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये