ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉमरेड गोविंद पानसरे व  कॉमरेड गणपतराव अमृतकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

चांदा ब्लास्ट

भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर जिल्हा कौन्सिल बैठक नुकतीच कॉमरेड दादा ठाकरे सातारा कामठी तालुका पोभूर्ना जिल्हा चंद्रपूर यांचे फॉर्म हाऊस यांच्या निवास स्थानी संपन्न झाली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान कॉमरेड प्रा. नामदेव कन्नाके माजी जिल्हा सचिव भा क पा यांनी केले.तर प्रमुख पाहुणे म्हणून कामरेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भा क पा कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भा क पा कॉमरेड ए के कॅप्टन आयटक कामगार नेते कॉमरेड डॉ महेश रेड्डी कम्युनिस्ट नेते इत्यादी नेते मंडळी उपस्थित होते.

सर्व प्रथम पक्षाचा लाल ध्वज फडकवून सर्वांनी श्रद्धांजली देऊन सलामी दिली कॉमरेड गोविंद पानसरे व कॉमरेड गणपतराव अमृतकर यांच्या स्मारकावर फुल हार अर्पित करण्यात आले.

कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या वर कोल्हापूर येथे दि.16 फरवरी 2015 रोजी धर्मांध शक्तींनी हल्ला केला त्यात उमा पानसरे याही जखमी झाल्या व दिनाक 20 फरवरी 2015 रोजी कॉमरेड गोविंद पानसरे यांचे निधन झाले आयुश्यभर कॉमरेड गोविंद पानसरे यांनी नैतीकता व उच्च भारतीय सांस्कृतिक मूल्य जपून जगण्याचा प्रयत्न केला भारतीय संस्कृतिक टिकाऊ काय व टाकाऊ काय याचा सतत अभ्यास व विचार मंथन करून ते मांडण्याचे काम कामरेड गोविंद पानसरे करीत होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र चे नेते होते

आणि तसेच कॉमरेड गणपतराव अमृतकर हे 1950 पासून चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम सुरू केले होते. कॉमरेड ए बी बर्धन कॉमरेड ए के सण्याल असे मोठ मोठे नेते चंद्रपूर मध्ये येत असतं त्यांनी बरेच आंदोलन केले त्यांना जेल मध्ये बरेच वर्ष कोठडी सुद्धा झाली.

जिल्हा बैठकी मध्ये अनेक ठरावावर चर्चा करण्यात आले आशा वर्कर व गट प्रवरतक यांच्या जिल्हा अधिकारी चंद्रपूर व आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रभर आदोलन चालू आहे त्यावर चर्चा करून ठराव करण्यात आले.

भा क पा ची नूतनीकरण व पक्ष नोंदणी करणे विषयी चर्चा सन 2024 लोकसभा व विधानसभा निवडणूक विषयी चर्चा E v m मशीनवर बंदी आणून मतदारांमध्ये जनजागृती करून आदोलन करणे बाबत चर्चा या बैठकीत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये