सायबर पोलीस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 27/07/2023 रोजी फिर्यादी उमेर असद खान, वय 34 वर्ष, रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा हे घरी मोबाईलवर फेसबुक अकाउंट पाहत असताना त्यावर पॉपअप फटाके सबंधाने जाहीरात दिसल्याने फिर्यादीने दिलेल्या नंबरवर मॅसेज केला असता त्यांनी त्यांचा व्हॉटसअॅप नंबर दिला व पॉपअप फटाक्याचे प्रत्येकी बॉक्सची किंमत 3360/-रु. सांगीतले व नागपुर पर्यंत पाठविण्याचे 200 रु. प्रती बॉक्स प्रमाणे भाडे सांगीतले वरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात बोलणे झाल्याने फिर्यादीने त्याचे बैंक खात्यात 3500/- रु. पाठविले असता आरोपीने फिर्यादीस एक मोठा पॉपअप फटाके असलेला बॉक्स सॅम्पल म्हणून पाठविला त्यामूळे फिर्यादीचा विश्वास झाला. फिर्यादी यांनी परत आरोपीतास 50 बॉक्सचा ऑर्डर केला व 1,73,440/-रु देण्याचे ठरले. त्यापैकी फिर्यादीने आरोपीतांनी दिलेल्या अॅक्सीस बैंक खात्यावर 10,000/- रु अॅडव्हान्स पाठविले असता,
आरोपीने परत पैश्याची मागणी केल्याने फिर्यादी यानी बिल्टी मागुन त्यावर असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नंबरवर फोन करुन 50 बॉक्स ट्रान्सपोर्ट कंपनी इंदौर यांचे ताब्यात मिळाले असल्याची शहनिशा करुन फिर्यादीने त्याचे भावाचे आयसीआयसीआय बैंक खातेवरुन आरोपीचे अॅक्सीस बैंक खात्यावर 1,63,440/-रु. पाठविले. त्यानंतर हंस एजन्सी नागपुर येथुन फोन आल्याने तिथे जावून बॉक्सची पाहणी केली असता फिर्यादीस खाली बॉक्स असल्याचे दिसल्याने व त्याची एकुण 1,73,440/-रु ची ऑनलाईन आर्थीक फसवणूक झाल्याचे समजल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरुन दिनांक 30/11/2023 रोजी सायबर पोलीस स्टेशन येथे अप क्र. 29/2023 कलम 419, 420 भादवि सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा संपर्ण तांत्रीक पद्धतीने तपास व विश्लेषन करुन सदरचे आरोपी हे इंदोर, राज्य मध्ये प्रदेश येथे असल्याचे निष्पन्न झाले. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशान्वये सायबर पोस्टे मार्फत एक पथक तयार करुन दिनांक 08/01/2024 रोजी सदरचे पथक हे इंदोर येथे पोहचून सतत 4 दिवस आरोपीचा शोध घेवून आरोपी 1) नामे राजसिंग उर्फ भिम सोहनसिंग कुशवाह, वय 23 वर्ष, व आरोपी 2) जयराजसिंह उर्फ तानु सोहनसिंग कुशवाह, वय 26 वर्ष दोन्ही रा. ममनभाई मार्केट, वार्ड नं. 16 भवानीमंडी, झालावाड (राजस्थान) ह.मु भाग्यलक्ष्मी कॉलोनी, इंदोर, मध्य प्रदेश यांना ताब्यात घेवून सदर आरोपीतांकडून गुन्हयात वारण्यात आलेले 3 मोबाईल व 1 एटीएम असा एकुण 30,000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांकडुन महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कांचन प. पांडे, सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव, निलेश कट्टोजवार, कुलदिप टांकसाळे, अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, गोविंद मुंडे, प्रतिक वांदीले, पवन झाडे, मपोशि लेखा राठोड, स्मिता महाजन सर्व सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली



