ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या कत्तलीकरीता वाहतुक होणारे ६ ट्रक पोलिसांनी अडविले

७२ जनावरे गोवंश एकुण १ कोटी ७० लाख ७० हजाराचा मुददेमाल जप्त

चांदा ब्लास्ट

दिनांक २१/०६/२०२५ रोजी प्राप्त माहिती वरून काही टूक मध्ये जनावरे (गोवंश) यांचे हात, पाय, तोड बाधुन व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना दाटीने भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करीता घुग्घुस मार्ग पडोली, चंद्रपुर असे तेलगंना अवैधरित्या वाहतुक करीत आहे अशा माहिती वरून धानोरा टोल नाका, घुग्घुस रोड येथे नाकाबंदी करून खबरे प्रमाणे ०६ आयचर ट्रक हे घुग्घुसचे दिशेने आले. त्यावरून नमुद ट्रकची पंचा समक्ष पाहणी केली असता, वेगवेगळया ट्रक मध्ये जनावरे (गोवंश) यांचे हात, पाय, तोंड बाधुन व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्याल समते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना दाटीने भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करतांना मिळून आले. सदर वाहनाचे चालक, क्लिनर यांना वाहतुक करीत असलेल्या जनावरा बाबत कागदपत्र माहितले असता त्यांनी भंडारा, गोदिया येथुन जनावरे खरेदी केल्याचे पावत्या सादर केल्या. त्यावरून सदर पावत्या संबंधाने पडताळणी केली असता जनावरे वाहतुक करीत असलेल्या पावत्यावर सरकारी अधिकारी यांची बनावट सही करून त्याव्दारे सदर वाहतुक ही कायदेशिर असल्याचे दाखवुन अवैधरित्या प्राण्यांची कुरपणे वाहतुक करत होते, त्यावरून नमुद ट्रक चालकांकडुन ०६ ट्रक, जनावरे वाहतुक करण्यासाठी वापरलेली पायलटीग वाहन व एकूण ७२ गोवंश असा एकुण १,७०,७०,०००/- रू चा माल जप्त करून एकुण १८ आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन, घूग्गुस येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करीत असलेले जनावरे हे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपुर, जि. चंद्रपुर यांचेकडे जमा करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिला जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि, बलराम झाडोकार, पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि, संतोष निंभोरकार, पोउपिन सुनिल गौरकार, सफी/धनराज करकाडे, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहया/जयसिंग, पोहवा/गणेश मोहुर्ले, नापोशि/संतोष खेलपुलवार, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/प्रशांत नागोसे, पोशि/किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, चपोहगा / दिनेश अराडे, चपोशि/रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोलीस स्टेशन, घुग्घुस येथील सपोनि तायवाडे असे अधिकारी व कर्मचारी तसेच पशुधन विकास अधिकारी, घुग्घुस यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये