ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानवसेवेतच खऱ्या ईश्वरप्राप्तीचा आनंद- माजी मंत्री वडेट्टीवार

"कर्करोग निदान 'अद्यावत वाहनाचे चंद्रपुरात लोकार्पण

चांदा ब्लास्ट

राजकारण म्हणजे जनतेची सेवा करण्याकरिता मिळालेली जबाबदारीची संधी होय. एक सच्चा जनप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण फेडण्याकरिता क्षेत्र विकासासह प्रत्येक मूलभूत समस्यासह आरोग्य रक्षणाची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधीवर असते. राजकारणात संधी साधूंनी स्वार्थ साधले मात्र आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघातील हजारोंच्यावर नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राणघातक रोगांपासून लढण्यास सहकार्य केले. ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. हे माझे अहोभाग्यच. मानवरुपी देवताची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून मानवसेवेतच खऱ्या ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते चंद्रपूर येथे तालुका विजय किरण फाउंडेशनच्या वतीने आयोजित कॅन्सर निदान अद्यावत वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते विनायक बांगडे ,नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सुभाष सिंह गौर, माजी महापौर डॉ. महाकूलकर, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, सदलवार, युसुफ भाई,कृउबा सभापती गंगाधर वैद्य, डॉ. राहुल जवादे, नंदू जी नागरकर ,प्रवीण पडवेकर, वसंत देशमुख,शिवानी वडेट्टीवार, चित्राताई डांगे, सुनिता लोडिया, शिवा राव, राजेश अडुर, सचिन कत्याल,रमिझ शेख, कुणाल साहारे, संदीप सिडाम, प्रमोद बोरीकर, श्यामकांत थेरे, मुन्ना तावाडे, व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. अशातच राज्याच्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे रुग्ण असल्याचे पुढे येत असल्याने अनेकांना या जीवघेणा रोगामुळे प्राण गमवावे लागले. सोबतच कर्करोगावर उपचार म्हणजे अतोनात आर्थिक खर्च यामुळे गोरगरीब जनतेला ते न परवडण्यासारखे असल्याने ही गंभीर बाब लक्षात घेऊन एक सच्चा जनसेवक म्हणून कर्करोग या प्राणघातक आजारामुळे मतदार संघातील तथा जिल्ह्यातील एकाही नागरिकाचा मृत्यू होऊ नये यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त कर्करोग निदान फिरते इस्पितळ वाहन लोकसेवेत अर्पण करीत या मोफत कर्करोग तपासणी मुळे कर्करोग रुग्णांवर व इतर संभाव्य कर्करोग रुग्णांना लाभ होऊन त्यावर वेळीच उपचार केल्यास अनेकांची जीव वाचणार. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेऊन जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य जपावे असे आवाहनही यावेळी राज्याची माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. सध्याची राजकीय परिस्थिती ही फार वाईट असून स्वार्थ व संधी साधूंच्या भाऊ गर्दीत निष्ठावान लोकनेता सापडेना  उदाहरण देत सट्टा पक्षाकडे कोल्हापूर उड्या मारणाऱ्यांना चिमटा घेत माजी मंत्री वडेट्टीवार यांनी समाचार घेतला.या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व कर्करोग निदान अद्यावत वाहन निर्मितीसाठी सहकार्य करणारे राहुल जवादे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश युवा काँग्रेस सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुणाल सहारे यांनी केले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रांगणात पार पडलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये