Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यासाठी इंग्रजी कार्यशाळाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदा येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रारंभी बारसागडे सर यांनी प्रास्ताविक केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल मुसळे होते. प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रफुल्ल माहूरे (इंग्रजी भाषातज्ज्ञ, ब्लॉगर, उपप्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर) यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार प्राचार्य अनिल मुसळे यांनी केला.

प्रा. माहूरे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून सांगितले व स्कोअरिंग वाढवण्यासाठी उपयोगी उपाय सुचवले. पासिंग मार्क्स मिळविण्यासाठी घ्यावयाची काळजी, प्रश्नपत्रिका सोडविताना आवश्यक असलेली तयारी, तसेच Poetic lines तयार करण्याचे तंत्र याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. याशिवाय, Communication Skills सुधारण्यासाठी विविध तंत्रे व सराव पद्धती यावर भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलिमा बावणे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. निता मुसळे यांनी मानले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतून अभ्यासाच्या तांत्रिक गोष्टी आत्मसात केल्या असून, परीक्षेची भीती कमी झाल्याचे व आत्मविश्वास वाढल्याचे मत व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षक व कर्मचारीवर्गाचे महत्त्वाचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये