ताज्या घडामोडी

आदर्श हिंदी विद्यामंदिर येथे बालक दिवस साजरा

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बालक दिनाचे औचित्य साधून आदर्श हिंदी प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर गडचांदूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.माणिकगड सिमेंटचे वरिष्ठ अधिकारी माननीय बेहरा साहेब तथा गोवारदिपे उपस्थित होते.

बालक दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मानव पचारे,द्वितीय यश बुनकर तर तृतीय रागिनी प्रसाद यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण पाच समूहांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक कल्पना चावला ग्रुप तर द्वितीय क्रमांक न्यूटन ग्रुप यांनी पटकावला माननीय विशेष अतिथी बेहरा साहेब,प्रधान अध्यापिका डॉक्टर मंजुषा मत्ते यांनी विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना माननीय बेहरा साहेब यांनी आजचे बालक उद्याचे उज्वल भविष्य आहेत असा संदेश देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये