ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांची कोंबड्याची झुंज लावून पैसे हार जिद्दीचा जुगारावर फिल्मी स्टाईलने रेड

एकूण १६ लाख ४६ हजारावर मुद्देमालसह आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि.07/02/2024 रोजी भर दिवसा 13.00 ते 6.00 दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा वर्धाद्वारे पोस्टे सावंगी मेघे हद्दीत मौजा पांढरकवडा शिवारातील शेतात कोंबड्याची झुंज लढवून असंख्य कुस्तीचे कोंबडे आणून इंद्रापल नामक इसम हा मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या जिल्हातील लोक जमा करून कोंबडा कुस्तीचा जुगाराचे सेटअप लाऊन व तेथे सर्व प्रकारच्या सुविधा देत जुगार चालवत होता. या जुगाराचे महिती स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पथकाला मिळताच तीनही पथक कारवाही करणे कामी रवाना झाले. फिल्मी स्टाईल ने रेड केला असता सदर ठिकाणी 23 वाहने, नगदी 34000/- रु व 9 कोंबडे व 5 कोंबड्यांचे काती मिळून आल्या असे एकूण 16,48,800/- रु. चा मुद्देमाल जप्त करून सदर पो.स्टे. सावंगी मेघे.येथे आरोपी 1) इंद्रपल राजू भोसले रा. पांढरकवडा बेड 2) निलेश केवटे, रा. लिंगी मंदिराजवळ वर्धा 3) पवन धुळे, रा. पोलीस क्वार्टर समोर, वर्धा, 4) सुभाष सहारे, रा. अंजनगाव, 5) रोशन सांगोलकर, सेलू 6) सतीश पवार, वायफळ 7) अमित नाकाडे, फुल फैल 8) आतिश मसराम रा.बुरड मोहल्ला वर्धा. असे अटक आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.बाकी आरोपी आपले वाहन सोडून पळून गेले शेत मलकासहित 28 जनावर गुन्हा दाखल आहे.

             सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा. वर्धा श्री नूरल हसन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सागर कवडे सा. यांचे आदेशान्वये पो नी. श्री संजय गायकवाड स्था.गु. शा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पो.उप. नि सलाम कुरेशी,अमोल लगड, पो. हवा. नरेंद्र पाराशर, गजानन लामसे, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर,रितेश शर्मा, ना.पोशी. अमरदीप पाटील,नितीन इटकरे, राम इप्पर, संगसेन कांबळे, गोपाल बावनकर, मिथुन जिचकार, मंगेश आदे, अरविंद इंगोले, चालक गणेश खेवले सर्व स्था.गु. शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये