ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

29 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यात 7 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मराठी साहित्य मंडळ आयोजीत 7 वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यांतील तळेगाव येथील श्रीरंग कलानिकेतन सभागृह, इंद्रायणी कॉलेज समोर, वनश्री नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

साहित्य संमेलन चे उद्घाटन तळेगाव दाभाडे चे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे, संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक ऍड राम कांडगे, माजी आमदार चाकण, राहणार आहेत. मावळते अध्यक्ष जेष्ठ कवी सुरेश लोहार, कराड,स्वागताध्यक्ष डॉ. नेहा कुळकर्णी, तळेगाव दाभाडे, असून मुख्य अतिथी म्हणून जेष्ठ कवियित्री ललिता गवांदे, नाशिक, जेष्ठ लेखक डॉ घनश्याम पांचाळ,नांदेड, जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर, ठाणे, जेष्ठ लेखक सिद्धार्थ कुळकर्णी, मुंबई, जेष्ठ कवी राजेश थळकर, रायगड, संपादक सुरेश साखळकर, तळेगाव दाभाडे, सतीश साठे, श्रीकृष्ण पुरंदरे, प्रा. जयंत जोर्वेकर, उपस्थित राहणार आहे.

या साहित्य संमेलन मध्ये परिसंवाद, कवी संमेलन, विविध पुरस्काराचे वितरण करण्यात येईल,तरी कवी, साहित्यिक, तथा नागरिकांनी या साहित्य संमेलन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठी साहित्य मंडळाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये