ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीकचा विदर्भातुन सर्वत्कृष्ट निकाल

विद्यार्थानी स्वतः शी स्पर्धा केली तर यश निश्चित - श्री.पी.एस.आंबटकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.

                 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२३ सेमिस्टर पद्धतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला,ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थानी आपल्या उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत निकालात आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.

                MSBTE मध्ये रुजू झालेल्या नवीन K स्कीम नवीन अभ्यासक्रमातही सेमिस्टर मध्ये उत्कृष्ट निकाल आहे. महाविद्यालयाती इलेक्ट्रिकल प्रथम सेमिस्टरमध्ये १०० टक्के गुण मिळविले आहे,तसेच संगणक प्रथम वर्षातील सेमिस्टरमध्ये ९२ टक्के गुण प्राप्त केले आहे,मेकॅनिकल प्रथम विभागातील सेमिस्टरमध्ये ९१.१७ टक्के गुण घेतले आहे, तसेच इलेट्रोनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजि प्रथम विभागातील सेमिस्टरमध्ये ८०.६४ टक्के गुण प्राप्त केले आहे, सिव्हिल प्रथम विभागातील सेमिस्टरमध्ये ८०.०० टक्के विध्यार्थानी गुण प्राप्त करून संस्थेचे नाव अलौकिक केले आहे.

      तसेच या निकालामध्ये इलेक्ट्रिकल अँड टेलीकॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजि द्वितीय वर्षाची विध्यार्थिनी कु.अर्पिता वांढरे ९१.५० टक्के मिळवुन संस्थेत प्रथम येण्याचा मन पटकावला त्याचबरोबर सिविल इंजनियरिंग विभागातील इशिका लोहकरे ८७.५० टक्के गुण मिळवले ,मुस्कान कुरेशी कॉम्प्युटर सायन्स इंजनियरिंग विभागातील हिने ८७.०० टक्के प्राप्त केले व मेकॅनिकल इंजनियरिंग विभागातील प्रथम वर्षांच्या कार्तिक वावरदडपे यांनी ८६.७१ टक्के, नेहा रामटेके ८६.०० टक्के प्राप्त केले.

               तसेच यावर्षीच्या निकालात ९३ विध्यार्थानी ८० टक्केच्या वर गुण प्राप्त केले.त्यामध्ये शुभानशु जुमडे ८६.४७ टक्के, नेहा रामटेके ८६.०० टक्के, मानसी चव्हाण ८५.८८ टक्के,सुफियान शेख ८५.५३ टक्के, रुद्राक्ष कोट्टलवार याला ८५.२९ टक्के ,अंजूश्री टोकालवार हिला ८४.८५ टक्के,सोहन रचालवार याने ८५.०५ टक्के ,प्रमय येलमुरला याने ८४ .८२ टक्के,कृष्णा तिवारी याला ८४.७१ टक्के,पृथ्वीराज चव्हाण याला ८४.७१ टक्के, श्रुती गाउतरे हिला ८४.५९ टक्के ,संकेत करमरकर ८४.०६ टक्के, क्रिष्णाली रानदीवे हिने ८३.३३ टक्के, प्रतीक भीमपल्लीवार ८३.०६ टक्के,सम्यक फुलमाळी ८३.०६टक्के, वैष्णवी चिन्नाला ८३.१२ टक्के ,रोहित सोनावणे ८२.३५ टक्के,श्रुती येल्लेकर ८२.१२ टक्के, प्रथमेश चव्हाण ,आदित्य बुरान ८२.८८ टक्के,स्नेहा कैथल ८२.७७ टक्के,प्रीती देरकर ८२.२४ टक्के, तरंग शिंदे ८२.१० टक्के, नितेश देशभरतकर ८१.३३ टक्के, प्रथमेश कोंडमवर ८१.०६ टक्के,हर्ष आकनुरवार ८१.०० टक्के, नयन दास ८०.४ टक्के,प्रशिल करमरकर ८०.९५ टक्के, तरंग शिंदे, इत्यादी चा समावेश आहे,तर काही विध्यार्थानी वैयक्तीक विषयात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

                          विध्यार्थानी स्वतः शी स्पर्धा केली तर यश निश्चित मिळते पण ज़िद्ध कायम असली पाहिजे,स्वप्नांना पूर्ण करण्याची,हेच स्वप्न घेऊन वाटचाल करीत राहिले पाहिजे.यशाने हरळून न जात आणि अपयशाला खचून न जाता आपली वाटचाल करीत राहिले पाहिजे आणि अभ्यासासाठी स्वतःशीच स्पर्धा केली तर यश निश्चित मिळेल.

    संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.अनिल खुजे ,विभागप्रमुख तसेच सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा,शिस्त,नियमित वर्ग,थेरी ,प्रात्यक्षीक व मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल कौतुक करीत संस्थेतर्फ यशस्वी विध्यार्थाना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये