ताज्या घडामोडी

चंद्रपुरात मोठा शस्त्रसाठा जप्त – स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश

शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

दिनांक २५/०१/२०२४ रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अरविंद नगर परिसरात ७-८ इसमांनी मिळून शिवा वझरकर या उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाध्यक्षाची धारदार शस्त्राने केलेल्या निर्घृण हत्येमुळे चंद्रपुर शहरात एकच खळबळ माजली होती. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी ह्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचेकडे सोपविला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आठ आरोपींना अटक केली. हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर शरीरीराविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत. ह्या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असुन ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याचा रेतीचा तसेच वाहतुकीचा व्यवसाय आहे. मृतक हा पूर्वी स्वप्नील काशिकर याचे कडेच ठेकेदारीचे काम करायचा. पुढे चालून वर्चस्वाच्या तसेच पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून स्वप्नील काशिकार याचे ऑफीसचे समोरील मोकळ्या जागेतच सदर खुनाचा गुन्हा घडून आला.

पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपी स्वप्नील काशिकर याचे ऑफीसची झडती घेतली असता त्याचे ऑफीसचे सोफ्यातून १) एक लोखंडी तलवार २) एक एअर गन ३) ऑफीस टेबलचे खाली एक लोखंडी तलवार ४) एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा मिळून आला. सदरचा शस्त्रसाठा पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला. सदर शस्त्रसाठा कुठून आणला याबाबत आरोपीतांकडून सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, सपोनि किशोर शेरकी, सपोनि विकास गायकवाड, पोउपनि विनोद भुरले, पोहवा सुधिर मत्ते, पोशि नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे, प्रमोद कोटनाके, चापोहवा प्रमोद डंभारे, चापोशि रूषभ बारसिंगे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये