नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
शासनाचे चुकीचे धोरण, निवडणुकीपूर्वी दिले होते आश्वासन., मात्र कर्ज माफ झाले नाही..! निमणी येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील निमणी येथील 70 वर्षीय वृध्द शेतकऱ्याने सततचा पाऊस नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तसेच शासनाने निवडणुकी पूर्वी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते परंतु एक वर्ष लोटूनही कर्ज माफ न झाल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारला सकाळी 10 वाजता सुमारास घडली.
गजानन नागोबा झाडे वय 70 अल्पभूधारक शेतकरी यांच्या नावाने निमणी येथे 3 एकर शेती आहे मागील वर्षापासून सततची नापिकी व या वर्षी सुद्धा सततच्या पावसाने पिक उध्वस्त झाल्याने व शासनाने कर्ज माफीची घोषणा केली पण प्रत्यक्षात कर्जबाजारी न केल्याने बँकेचा तगाद्यामुळे मागील चार महिन्याच्या अगोदर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचांदुरचे पूर्ण कर्ज रक्कम 2 लाख पन्नास हजार रुपये सावकारांकडून कर्ज काढून बँकेचे कर्ज नील केले पण सावकारांचे कर्ज कसे परत कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने मागील काही महिन्यापासून अस्वस्थ असल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे असा कयास व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी गडचांदुर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुलगी सुना नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.