कोरपना येथे नवीन पेट्रोल पंपचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि भाजपच्या सहकार सेलचे माजी जिल्हा संयोजक किशोर बावणे यांच्या नव्या मे. मंगलमूर्ती पेट्रोल पंपचे राजुरा क्षेत्राचे आमदार भोगळे यांनी उद्घाटन केले.
किशोरभाऊंना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या या नव्या पेट्रोल पंपवरून ग्राहकांची उत्तम सेवा होईल; अशी भावना राजुरा क्षेत्राचे आमदार भोगळे याठिकाणी व्यक्त केली. किशोर बावणे यांनी माझ्या पेट्रोल पंपावर कधीही पेट्रोल व डिझेल कमी पडू देणार नाही अशी गवाई यावेळी व्यक्त केली
यावेळी सौ. अर्चना,भोगळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, अरूण मडावी, अबरार अली, ओम पवार, मारोती येरणे, गीता डोहे, नामदेव वरभे, रविकांत बालपांडे, गजानन खामनकर, आदिंसह बावणे परीवारातील नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते.