ताज्या घडामोडी

स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती व स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळा संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे संस्थापक सचिव स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त व स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन सोहळ्याचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय,शरदराव पवार वरिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शरदराव पवार महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 20 ऑगस्ट ला करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले साहेब होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यालय महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीरामजी पुंजेकर, संचालिका श्रीमती नलिनीताई डोहे,प्राचार्य संजय कुमार सिंह, मुख्याध्यापक धर्मराज काळे ,प्राचार्य वर्षा गुडधे प्रा. संजय गोरे, डॉ. के. आर. भोयर, धनंजय पाटील गोरे ,सचिन भोयर ,गोसावी भोयर, अनिल देवलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहारे, प्रा.करमनकर सामाजिक कार्यकर्त्या सरोजा चांदेकर ,माजी नगराध्यकक्षा विद्या कांबळे ,सेवानिवृत्त शिक्षिका आशाताई पुंजेकर यांनी स्वर्गीय राजीव गांधी व स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली याप्रसंगी विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्यालयातील तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये