ताज्या घडामोडी

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून बालक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ चे ई.आर. हेड नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 14 नोव्हेंबर हा जागतिक बालक दिन जिल्हा परिषद शाळा जामणी व आदर्श हिंदी स्कूल गडचांदूर येथे सी.एस.आर. अंतर्गत उत्साहात साजरा करण्यात आलात.

या बालक दिनी जामणी मध्ये शाळेतील मुलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करून मुलांना सन्मानीत करण्यात आलेत तर बालक दिनाचे महत्व मुख्याध्यापक बेरड सर व शिक्षक वर्गाद्वारे सांगण्यात आलेत.

तसेच गडचांदूर येथील आदर्श हिंदी शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आलीत. यावेळी शाळेतील विध्यार्थ्यानी वेगवेगळ्या देशभक्ताचे वेशभूषा करून सर्वांचे मन आकर्षित केलेत तर प्रश्न मंजुषा द्वारे सर्व मुलांप्रयत्न बालकदिनाचे महत्व पोहचविण्यात आलेत.

माणिकगढ चे सुरक्षा प्रमुख मानस बेहरा व मुख्याध्यापिका डॉ मंजुषा मत्ते याचे द्वारे विजेता मुलांना सन्मानित करून वर्ग 1 ते 10 विच्या सर्व 272 विध्यार्थ्यांना शालेय बॅग सुद्धा वाटप करण्यात आलेत.

यावेळी बोलतानी मानस बेहरा यांनी बालक दिनाचे महत्व सांगून सर्व मुलांना बालक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात शाळेतील शिक्षक वर्ग व सीएसआर टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये