ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊर्जानगर नेरीत आश्विन पूर्णिमेला पवारणा उत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

वर्षावास समाप्तिच्या पर्वावर अर्थात आश्विन पूर्णिमादिनी स्वत: बुध्दाने भिक्खु संघाला  पवारणा आयोजित करण्यासाठी सांगीतले. असे बौध्द इतिहास सांगतो. पवारणा ही संघकृती जरी असली तरी उपासकांच्या सहभागाशिवाय ती अपूर्ण आहे. म्हणूनच पवारणा उत्सव हा भिक्खु आणि उपासकांचा समन्वय साधणारा मनोरम्य धम्म उत्सव होय. पवारणा उत्सव धम्मगंध सुगंधीत विविध अंगानी प्रबोधित करण्यासाठी तथा प्रकाशित करण्यासाठी दुर्गापूरच्या धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्म प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी येणाऱ्या आश्विन पूर्णिमेच्या सायण्ह प्रहरी ऊर्जानगर नेरी येथील पंचशील प्रज्ञाविकास मंडळाच्या प्रसिद्ध शालवन बुद्ध विहारात बुध्दकृत मानवतेची सनद प्रदानक पवारणा उत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे.
सदर धम्म उत्सवात 1) वर्षावास समाप्तीचे रुपांतरण पवारणा – शोध आणि बोध 2) गोतम बुध्द-घरपोच शिक्षण देणारा जगातील पहिला शिक्षण शास्त्रज्ञ 3) बुध्दकृत मानवतेची सनद. या महत्व्दपूर्ण विषयांवरती आधारित धम्मदेसना व बुध्दिस्ट क्विज,  इत्यादी अभिनव उपक्रमानी संपन्न  होत  आहे.
यास्तव बहुजन हिताय बहुजन सुखाय बुध्दाने प्रस्थापीलेल्या वर्षावासपवारणा व धम्मचारिका  या तीस्तरीय बौध्द शैक्षणिक परंपरेच्या संवर्धनार्थ आयोजित पवारणा उत्सवात दुर्गापूरऊर्जानगर तथा चंद्रपूर परिसरातील धम्मप्रिय बांधवांनी मोठया संख्येनी सायंकाळी 7.00 वाजता शालवन बुद्ध विहारात उपस्थित राहावे. असे विनम्र निवेदन कविता नळेसंगीता मानकरमीनाताई वालदे दुर्गापुर तथा निमंत्तक मा.हरीदास उराडेसंस्था अध्यक्ष नेरी यांनी एका संयुक्त प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये