ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. अशोक जिवतोडे यांना राष्ट्रसंत पुण्यतिथी साहित्य विशेषांक भेट

राष्ट्रसंताचे विचारधन ग्रामपरिवर्तनाच्या कार्यास गतीमान करणारे - डॉ. जिवतोडे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      मानवतेचे महान पुजारी, थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी तथा सर्व संत स्मृती मानवता दिन देशविदेशातील श्रीगुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत गुरूकुंज आश्रम येथे नुकताच संपन्न झाला. गुरूकुंज आश्रम येथील श्रीगुरुदेव प्रकाशन विभागाच्या वतीने या निमित्ताने पुण्यतिथी साहित्य विशेषांक प्रकाशित करण्यात आला. हा विशेषांक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी शिक्षणमहर्षी डॉ. अशोक जिवतोडे यांना सस्नेह भेट दिला.

      सदर विशेषांक वाचनीय असून येथील विचारधन ग्रामसुधारणेच्या कार्यास अधिक गतीमान करणारे असल्याचे मत डॉ. जिवतोडे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी याप्रसंगी श्री गुरुदेव मासिक विभागाच्या कार्यास धन्यवाद दिले.

   या विशेषांकाच्या निर्मितीसाठी श्री गुरुदेव वाड्.मय विभागाचे समिती प्रमुख लक्ष्मणराव गमे, विभाग प्रमुख गोपाल कडू, संपादक डॉ. दीपक पुनसे, इतर सर्व सदस्य, सचिव प्रल्हाद गिरी, लेख संपादन सहकार्य बंडोपंत बोढेकर आदींनी या करिता विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये