ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन रस्त्याचे बांधकाम व स्मारकाचे सौंदिँर्यकरण करावे

जिल्हाधिकारी व नगर परिषद वर्धा यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा नगरपरिषद प्रशासन द्वारे वर्धा शहरामध्ये जागोजागी रोडचे व सौंदर्यीकरण चे काम चालू करण्यात यावे इतवारा चौक ते जामा मस्जिद चौक ते लोकमान्य तिलक चौक गोलबाजार मार्केट व जामा मस्जिद चौक ते पटेल चौक ह्या भागात 5 ते 7 वर्षा अगोदर नवीन रोड बनविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून या कामासाठी निधी पण आला असून आता पर्यंत या भागातले रोड बनविण्यात आलेले नाही.

  इतवारा चौक मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे स्मारक ऊभारणार होते व त्यांच्या स्मारकाचे सौंदिर्यकरण करणार होते पण आता पर्यंत सौंदिर्यकरण झालेले नाही तसेच या गोष्टीची माहिती नगरपालिका वर्धा येथील मुख्य अधिकारी श्री राजेश भगत वर्धा तसेच वर्धा जिल्ह्यातले जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांना पण ह्या गोष्टीची माहिती देण्यात आली असून व वारंवार निवेदन देण्यात आलेले असून डॉक्टर अब्दुल कलाम चौकातील रस्ते बांधण्यात आलेले नाही या गोष्टीकडे नगरपालिका वर्धा व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

नगरपालिका वर्धा प्रशासनाला आमची संघटना नम्र विनंती करते की ह्या भागातले लवकरात लवकर रोडाचे काम व सौंदिँर्यकरण करावे अशी मागणी आमच्या वीर अशोक सम्राट संघटनामार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये