Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

डॉ. आंबेडकर – युवावर्ग व प्राध्यापकांसाठी प्रेरणादायी – प्रा. चहांदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘अभ्यासू वृत्ती, कठोर परिश्रम, चिकाटी, विपरीत परिस्थितीवर मात करण्याची जिद्द व उच्च ध्येय असल्याशिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकत नाही. या दृष्टिकोनातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी जीवन व प्राध्यापक म्हणून कारकीर्द युवा पिढी व प्राध्यापकांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ६ डिसेंबर रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन पर्वावर स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापक डॉ. चहांदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुनिता सोनारे उपस्थित होत्या. याप्रसंगी एनसीसी छात्र सैनिक कु. पूर्वा कापटे, लक्ष्मी सहारे, विकी पेंदोरकर व कॅडेट नयन तुमसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश यावले यांनी केले. संचालन प्रा. सुनील राठी तर आभार प्राध्यापक पाहुणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये