ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सम्यक संबोधी बुद्ध विहारात वर्षावास समारोप उत्साहात संपन्न

बुद्धधम्माच्या जागरणाचा सुंदर सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चाललेल्या वर्षावासाचा समारोप सोहळा सम्यक संबोधी बुद्ध विहार, बोरकर नगर, गडचांदूर येथे दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बुद्धधम्माचे आचरण आणि प्रसार याला चालना देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मोठ्या सहभागामुळे यशस्वी ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा माधुरी ऊके होत्या, तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. माया गोंडाणे उपस्थित होत्या. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका कोरपना अध्यक्ष श्रावण जीवने, प्रा. डॉ. सोमा गोंडाणे, दिव्यकुमार बोरकर, पाझारे सर, पद्माकर खैरे, उत्तम पारेकर, बेबीताई वाघमारे आणि दशरथजी डांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांनी तथागत गौतम बुद्धांचे समतावादी विचार, धम्माचे महत्त्व, पंचशील, अष्टांगिक मार्ग तसेच प्रज्ञा, शील व करुणा यांचे जीवनातील स्थान यावर प्रकाश टाकला. वर्षावासाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे आचरण आणि प्रसार करण्याची आवश्यकता अधोरेखित करताना त्यांनी समाजात बंधुता, सामाजिक सलोखा आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सोमा गोंडाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विहाराचे अध्यक्ष सूरज जगताप यांनी केले. या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमातून बुद्धांच्या धम्मविचारांचा जागर करण्यात आला आणि उपस्थितांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये