ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथे संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांची २८५ वी जयंती जिवती येथील संत रामराव महाराज चौक बसस्थानक परिसरातील पटांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीची सुरूवात

पोरीयातारा रामनगर येथे सेवालाल महाराजांचा भोग भंडार कार्यक्रम करून सुरुवात झाली.डफड्याच्या तालावर बंजारा वेशभूषा परिधान करून बंजारा गीते,लेंगी सादर करीत नाचत पोरियातारा ते शांतीनगर पर्यंत रॅली काढून जल्लोष साजरा केला.उपस्थीत मान्यवरांच्या स्वागतासाठी रामनगर (जिवती),मरकलमेटा,करणकोंडी,येथील चिमुकल्यांनी बंजारा गीतांवर बंजारा संस्कृतील वेशभूषा परिधान करून डान्स सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

         या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे, उद्घाटक नंदूजी राठोड नाईक, संचालक पांडुरंग जाधव,माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, नगरसेविका सतलूबाई जुमनाके,संचालिका पंचफुला जाधव,माजी सरपंच रूकमाबाई राठोड, नगरसेवक ममताजी जाधव,कैलास राठोड,गणपत आडे,सहा.पोलिस निरीक्षक राहूल चव्हाण,अशोक जाधव, प्रभाकर पवार,प्रा.सुग्रीव गोतावळे, सतिश राठोड, अविनाश जाधव, अंबादास राठोड,सुदाम राठोड, नामदेव जाधव,आशिष डसाने,नगरसेवक जमालूदिन शेख,विलास पवार, तसेच संपूर्ण नगरसेवक,सह तांड्या तांड्यातून आलेले नाईक, कारभारी यांच्या उपस्थितीत जिवती नगरपंचायतचे नगराध्यक्षा कविता आडे यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी संत सेवालाल महाराज जिवन चरित्र वाचलं संत सेवालाल महाराजांच्या विचारांना आत्मसात करीत गोर संस्कृती जोपासली जावी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी विशेष लक्ष देत आपली प्रगती करावी अशा विविध विचार उपस्थित मान्यवरांनी मांडले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश राठोड, प्रास्ताविक गजानन आडे यांनी केले तर आभारप्रदर्शन नगरसेवक अमर राठोड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक कमेटी व युवकांनी पुढाकार घेत कार्यक्रम यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये