ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मालवाहू टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

एक जण गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        चिखली – जालना राष्ट्रीय महामार्गांवर हॉटेल प्रसाद समोर आज (दि.6 मे रोजी) सोमवारला सकाळी 8:00 वाजता दरम्यान चिखली कडून देऊळगांव मही येणाऱ्या मालवाहू टेम्पो क्रमांक एम. एच.28 बीबी 4639 व जालनाकडून चिखलीकडे जाणाऱ्या दुचाकी डीलक्स क्रमांक एम. एच.21- 4815 ची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात दुचाकीस्वार गणेश बबनराव शिंगाडे वय 30 रा डोंगरगांव ता. बदनापुर जि. जालना हा जागीच ठार झाला तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेला गणेश रामराव बन्सोडे वय 32 रा. डोंगरगांव हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला जालना येथे रेफर करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक गणेश शिंगाडे व गणेश बन्सोडे हे दोघेजण डोंगरगांव वरून खैरव अंबाशी ता. चिखली येथे सासऱ्याच्या दाव्हाळ या कार्यक्रमासाठी जात असतांना रस्त्यातच काळाने झडप घातल्यानं अपघातात गणेश शिंगाडे याचा अपघातास्थळीचं मृत्यू झाला तर साथीदार गणेश बन्सोडे गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती लहान भाऊ सुरेश बबनराव शिंगाडे व आई यांना मिळताच त्यांनी देऊळगांव मही ग्रामीण रुग्णालय गाठले व त्याठिकाणी एकच टाहो फोडला होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस चौकीचे पोहेकॉ कलीम देशमुख, पोहेकॉ गिते हे घटनास्थळी पोहचून मालवाहू टेम्पोला ताब्यात घेतले असून वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ देशमुख व पोहेकॉ गिते, पोकॉ राजू मोरे हे करित आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये