ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ढाब्यामधुन गांजा अंमली पदार्थ व दारू मालाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   माननीय श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 04 डिसेंबर 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन सावंगी मेघे हद्दीतील मौजा धोत्रा (रेल्वे) शिवारातील, वर्धा ते पुलगाव रोडवरील जय महाकाली ढाब्यामध्ये एन.डि.पी.एस. व दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी नामे 1) रत्नेश कुमार सुखदेवप्रसाद तिवारी 2) अजय सुदाम आडे, दोन्ही रा. धोत्रा (रेल्वे), पोस्ट सालोड, जि. वर्धा हे हजर मिळुन आले असुन, पंचासमक्ष ढाब्याची झडती घेतली असता, झडती दरम्यान काउंटरखाली एका पिशवीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. तसेच ढाब्यासमोर उभ्या असलेल्या एका अॅक्सेस 125 मोपेड क्र. MH-32/AZ-5095 चे डिक्कीमध्ये व पल्सर 150 मोटर सायकल क्र. MH-32/AM-3578 चे साईड डिक्कीमध्ये व काउंटरखाली दोन चुंगड्यांमध्ये देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा मिळुन आल्या. सदर गांजा अंमली पदार्थ व दारूचा माल हा आरोपी रत्नेश कुमार तिवारी व त्याचा साथीदार अजय आडे यांचे मालकिचा असुन, ते स्वतः गांजा व दारूविक्रीचा अवैध व्यवसाय करीत असुन, दारूचा माल हा आरोपी 3) पप्पु सेवेकर रा. सालोड याचेकडुन व गांजाचा माल हा आरोपी 4) हमीद षेख रा. पुलगाव याचेकडुन स्वतः मारूती 800 कार क्र. MH-32/C-1320 नी जावुन खरेदी केला असुन, आरोपी 5) अंकित राजेश जयस्वाल रा. सावंगी मेघे वर्धा याने त्याचा ढाबा आरोपीतांना गांजा व दारू विक्रीच्या अवैध व्यवसाय करण्याकरीता उपलब्ध करून दिला आहे. तरी नमुद आरोपी हे संगणमताने गांजा अंमली पदार्थ व दारू मालाची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन 701 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, विदेशी रॉयल स्टॅग कंपनीच्या 170 सिलबंद शिशा, देशी गोवा संत्रा नं. 01 कंपनीच्या 21 सिलबंद शिशा, 02 मोबाईल व 03 वाहनांसह जु.कि. 4,03,120 रू चा मुद्देमाल जप्त करून, सर्व आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सावंगी मेघे येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, अखिल इंगळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये