ताज्या घडामोडी

अक्षरा व दिव्यांग साहिल जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत चमकले – पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटवार ह्यांनी प्रदान केले बक्षिस

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली खुर्दला मिळाले जिल्हास्तरावर यश

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

मेरी माटी मेरा देश व मतदार जागृती अभियानांतर्गत आयोजित जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत राजुरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या चिंचोली खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी अक्षरा प्रभाकर अहिरकर ने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. केंद्र, तालुका तसेच जिल्हा अशा तीनही स्तरावर तिने प्रथम क्रमांक पटकवून शाळेसह राजुरा तालुक्याचा सन्मान वाढवीला

दिव्यांग साहिलच्या कौशल्याने केले प्रभावित

शाळेतील एका हाताने दिव्यांग असलेल्या साहिल चंदू तुमराम ह्या विद्यार्थ्याने चित्रकलेची आवड जोपासत कुठल्याही तांत्रिक प्रशिक्षणाशिवाय आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन करीत प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले. त्याने काढलेल्या चित्राला पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने दिव्यांग साहिलला नवी उमेद मिळाली असुन भविष्यात उत्तमोत्तम चित्र रेखाटून तालुक्याचे नावलौकिक वाढविण्याची जिद्द त्याच्या बालमनात निर्माण झाली आहे.

साहिल हा एका हाताने दिव्यांग जरी असला तरीही त्याच्यात लपलेला कलावंत शाळेच्या शिक्षकांनी वेळीच ओळखुन त्याच्या कलेला जोपासण्याचा मंत्र साहिलला दिला त्याचप्रमाणे त्याच्या कलेला वाव मिळावा ह्यासाठी वेळोवेळी त्याला मदत करून तसेच त्याने रेखाटलेली विविध चित्रे शाळेतील इतर विद्यार्थ्यांना दाखवुन सहीलचे मनोबल वाढविण्यासाठी  शाळेचे मुख्याध्यापक संजय चिडे ह्यंचेसह शिक्षकवृंद नीता कोंडेकर, उद्धव राठोड, सुनिल तुराळे, श्रीकांत भोयर ह्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

सदर कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला ह्यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा (जिल्हाधिकारी), जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्यशिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उपस्थित होते. अक्षरा व साहिलच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी पारखी व इतर सदस्यांनी कौतुक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये