ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाडी नाल्याला पूर – नाल्यावरील पुल ओलांडताना गाडी पडली नाल्यात

नमूद तिनी इसमांची सुखरूप पुरातून सुटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 सतत कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघाडी नाला येथे पूर आला होता. सदर नाल्यावरील पूल ओलांडून येताना 1)विलास शहाणे रा.जाम.2) हरिलाल बारेत रा. राज्यस्थान 3) रामकिसन गौतम रा. मध्य प्रदेश हे सदर नाल्यावरील पूल ओलांडून येत असताना त्यांची गाडी पुलावरील पाण्याच्या ओघाने नाल्यात पडली तिन्ही इसम थोड्या अंतरावर वाहत जाऊन नाल्यामधील झाडावर अडकून पडले होते पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर आणि त्यांची टीम पीएसआय देरकर, टेंभुर्णी, पोलीस शिपाई रोशन उईके, हनवटे, तसेच वर्धा पोलीस मुख्यालय येथील पोलिस आपत्ती व्यवस्थापन टीम यांनी तात्काळ सदर पुराच्या पाण्यात जाऊन नाल्याच्या मधोमध झाडावर अडकलेल्या नमूद तिनी इसमांची सुखरूप पुरातून सुटका केली आहे.

 पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कृपया स्वतःचा जीव धोक्यात घालून कुणीही पुराच्या पाण्यातून जाण्याचे धाडस करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये