ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात “वर्तमानात क्रीडा क्षेत्रात करियरच्या संधी” विषयावर चर्चासत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती म्हणजेच २९ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ‘वर्तमानात क्रीडा क्षेत्रात करियरच्या संधी’ या विषयावर विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवतीच्या क्रीडा विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.

या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी त्यांचे आवडते खेळ आणि त्या क्षेत्रात करियरसाठी असणाऱ्या संधी, याबद्दल मत मांडून आपले प्रश्न आयोजकांसमोर ठेवले. डॉ. श्रीकांत डी. पानघाटे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करून विद्यार्थ्यांसाठी सध्या असणाऱ्या विविध संधी या बाबींचा सविस्तर उहापोह केला.

तर प्रा. गजानन एस. राऊत यांनी ऑलंपिक स्पर्धेत पदके खेचून आणणाऱ्या भारतीय खेळाडूंची नावे आणि त्यांच्या चमकदार कामगिरीचे वर्णन विद्यार्थ्यासमक्ष प्रस्तुत केले. महाविद्यालयाकडून विविध खेळात पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष दखल घेऊन आवश्यकतेनुसार त्यांना महाविद्यालयाकडून सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या चर्चासत्रात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सोबतच या क्रिडा दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या खेळात हिरहिरीने सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये