ताज्या घडामोडी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा द्वारे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट : अविनाश नागदेवे प्रतिनिधी वर्धा….

आज दिनांक 25 8 2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट* या ठिकाणी प्रवासी बस चालकांकरिता नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. *सदर शिबिरामध्ये एकूण १५७ व्यक्तींची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिल्हा शल्चिकित्सक डॉक्टर मनोज सकतेपार, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉक्टर जीवन तांबेकर, प्रमुख अतिथी डॉक्टर नमोदिया,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर चाचरकर यांच्या मार्गदर्शनात किशोर मेश्राम सुरेश पाटील यांनी काम पाहिले तर नेत्र तपासणी करिता डॉक्टर संजय बोबडे प्रफुल्ल काकडे यांनी काम पाहिले. सदर शिबिराच्या यशस्वी ते करिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटर वाहन निरीक्षक श्री गोपाल धुर्वे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री विशाल भगत, अमर पखान व लिपिक श्री शेखर रामटेके वाहन चालक घनश्याम टिक्कास यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये