ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे जागतिक योग दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक 21 जून 2023 रोज बुधवारला सकाळी सात वाजता जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून शालेय प्रांगणात जागतिक योगा दिन विविध योगासने करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी.आर.काळे,पर्यवेक्षक श्री महेंद्र ताकसांडे ,कु. चटप, श्री बावनकर, श्री मांढरे,श्री कोगरे, श्री मरसकोल्हे श्री पाटील श्री मेश्राम,प्रा. खैरे,प्रा. सातारकर प्रा. मुप्पिडवार, प्रा. पोडे, प्रा.मेहरकुरे, प्रा.सुरपाम व शारीरिक शिक्षक राजेश वासेकर उपस्थित होते. श्री राजेश वासेकर यांनी योगाचे महत्त्व व विविध आसने यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री सिताराम पिंपळसेंडे श्री शशिकांत चेन्ने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये