Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन २०२५ (रेझींग डे) सप्ताह निमित्य वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडून भव्य पोलीस प्रदर्शनी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने पोलीस विभागामार्फत नागरीकांना दैनंदिन पोलीस कामकाजाची माहिती व्हावी यासाठी भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थी व नागरिकांना सायबर जनजागृती व साक्षरता, वाहतून नियमन व रस्ते सुरक्षा, शस्त्र प्रदर्शनी, मॉडेल पोलीस स्टेशन, बॉम्ब स्कॉड, डॉग स्कॉड, बिनतारी संदेश वहन, महिला सुरक्षा, डायल ११२ कार्यपध्दती, चाईल्ड हेल्प लाईन १०९८, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, फरिन्सीक व्हॅन व टुल किट्स, QRT & RCP, गृहरक्षक दल, हरविलेले मोबाईल शोधण्याची कार्यपध्दती (CEIR), इत्यादी बाबत माहिती देण्यात येणार असुन दंगा नियंत्रण व नक्षलवादी हल्ला संबंधी लाईव्ह डेमोस्टेशन सुध्दा घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकरीता विविध प्रतियोगीतेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरची प्रदर्शनी दि. ०६ जानेवारी व ०७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. ते रात्री १०.०० वा. पावेतो पोलीस मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्धा येथे आयोजित करण्यात आले असुन सदर प्रदर्शनी करीता वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, वर्धा  अनुराग जैन (भा.पो.से.) यांनी आवाहन केले आहे. तरी वर्धा येथील विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर प्रदर्शनीचा लाभ घ्यावा हि विनंती आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये