अवैधरित्या गोवंशीय जनावरे नेणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडले
एकूण १४ लाख २० हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
जिल्हात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन साहेब, चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. रिना जनबंधु मॅडम, चंद्रपुर यांनी दिले. त्या अनुषंगाने दि.१९/०८/२०२४ रोजी रात्री २३.५६ वाजता गोपनीय माहीतीच्या आधारे एक ट्रक अवैध गोवंशीय जनावरे कृरतेने वाहनात भरून वाहतुक करीत असल्याचे खबरेवरून सावली पो.स्टे. तील डिव्हीजन गस्त व रात्रगस्त अधि. व अंमलदार यांनी पोस्टे सावली समोरील हॉयवे रोडवर छापा कारवाईसाठी नाकेबंदी करून नाकेबंदी दरम्याण जप्त ट्रक क. TS- ०२, UB-७६७१ ची पाहनी केली असता,
त्यामध्ये ४२ नग गोवंशीय जनावरे किंमत. ४,२०,०००/- रुपये व नमुद वाहन किमंत. १०,००,०००/- रुपये असा एकुन १४,२०,०००/- रुपयेचा माल मिळुन आल्याने आरोपी क. १) युनुस करिम शेख, वय२७ वर्ष, रा मरकागोंदी, ता जिवती, जि चंद्रपुर २) खदीर चॉद शेख, वय ३० वर्ष, रा बालाजी नगर जैनुर, ता जैनुर, जि असासिफाबाद, ३) फरार आरोपी आशिफ बाबुपटेल सय्यद, रा गोयेगाव, ता वाकडी, जि आसिफाबाद, ४) फरार आरोपी सादीक खान, रा गडचांदुर यांचे विरूध्द महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम १९७६, प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ व मोटार वाहन अधिनीयम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भगत साहेब, मुल यांचे मार्गदर्शना खाली सपोनि. जिवन राजगुरू, पोहवा. संजय शुक्ला/६३५, पोहवा. मोहन/२६२२,. पोअ. चंद्रशेखर / २५९, मपोंअ. किरण/६०२२ पोलीस स्टेशन सावली यांनी केली.
					
					
					
					
					


