महात्मा गांधी विद्यालय येथे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व क्रांतीसुर्य विर बापूराव शेडमाके यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे क्रांतीसुर्य वीर बापूराव शेडमाके व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्रचार्य प्रफुल्ल माहुरे, जयंती समिती प्रमुख प्रा नंदा भोयर, एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे उपस्थित होत्या.
सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण व क्रांतीसुर्य वीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कु. खुशी बिलोरिया हिने थोर पुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी पेंदोर हिने केले. तर आभार प्रा चेतना कामडी यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.