स्कॉलर्स सर्च जुनियर कॉलेजचा १०० टक्के निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात सर्च फाऊंडेशन द्वारा संचालित स्कॉलर्स सर्च ज्युनियर कॉलेज कोरपना चा १०० टक्के निकाल लागला.
यात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक रिद्धी महेंद्ग बोरा (77.33 टक्के) द्वितीय क्रमांक वैष्णवी संजय आडते (64.83 टक्के) तर तृतीय क्रमांक अथर्व महेश भिसे (62.17 टक्के) यांनी पटकाविला. या परीक्षेत एकून विज्ञान शाखेचे 54 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक प्रावीण्य श्रेणी, 3 प्रथम श्रेणीत व 50 उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण 54 हि विद्यार्थी पास झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्च फाउंडेशन चे संस्थापक इंजी दिलीप झाडे, कुंदा झाडे संचालक मंडळ, प्राचार्य राहुल उलमाले, करिष्मा साटोने, प्रणाली खडसे, संतोष जेणेकर, सारिका ढोंगले, भावना मोरे, स्नेहा पाटील,दिव्या शेंडे, विशाल मालेकार सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.