ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली व्दारा संचालीत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे दिनांक 28 फेबु्रवारी 2026 ला नोबल पुरस्कार पुरस्कृत डाॅ. सी.व्ही.रमन यांच्या उल्लेखनीय कार्याचे प्रतिक म्हणून महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष डाॅ.विजयराव शेडे उद्घाटक म्हणून तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ए.चंद्रमौली तथा विज्ञान शाखेतील सर्व विभाग प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील बहुतांश विद्याथ्र्यांनी त्यांच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विविध माडेल व पोस्टरचे उत्तम सादरीकरण केले. विज्ञान विषयावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनेक विद्याथ्र्यांनी उत्स्पुर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरूवात उद्घाटक डाॅ. विजयराव शेंडे यांच्या हस्ते माडेल्स व पोस्टर प्रदर्शनाचे फीत कापून व डाॅ.सि.व्ही रमन आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आले. यावेळी अतिथींनी पोस्टर व माडेल्सचे निरीक्षण करून विद्यार्थी व प्राध्यापकांची प्रशंसा केली.

विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे दृष्टीकोन समोर ठेवून स्वतःच्या जीवनाच्या विकासासोबतच समाज उन्नतीचा कास धरावे असे आव्हान केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पती विभागाचे विभाग प्रमुख प्रा. देवीलाल वताखेरे व त्यांचे सहकारी प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. संदीप देशमूख व त्यांचे सहकारी प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. प्रेरणा मोडक व त्यांचे सहकारी प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश घागरगुंुडे व त्यांचे सहकारी प्राध्यापक तथा महाविद्यालयातील इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये