ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१६ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत शास्तीत ५० टक्के सूट

ऑफलाईन कर भरल्यास ४५ टक्के सूट

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी थकबाकीदार मालमत्ता धारकांना १६ फेब्रुवारी २०२६ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास शास्तीमध्ये ५० टक्के सूट, ऑफलाइन भरल्यास शास्तीमध्ये ४५ टक्के सूट देण्यात येत आहे.

   d पालिकेच्या उत्पन्नात वाढ करून मालमत्ता कराची नियमित वसुली आवश्यक असल्याने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांना शास्तीमध्ये सूट देण्याचे अधिकार आहेत. मार्च २०२६ अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही नवीन सवलत योजना राबवली जात आहे.

  यापूर्वी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन व ऑफलाईनसाठी अनुक्रमे ७५ व ७० टक्के सूट शास्ती रकमेत देण्यात आली होती,आता १६ फेब्रुवारी २०२६ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास शास्तीमध्ये ५० टक्के सूट, ऑफलाइन भरल्यास शास्तीमध्ये ४५ टक्के सूट आणि १६ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास शास्तीमध्ये २५ टक्के सूट, ऑफलाइन भरल्यास शास्तीमध्ये २० टक्के सूट देण्यात येणार आहे.

  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू असुन हरचरणसिंग सलुजा यांच्या मालकीचा व भगवानदास डोडानी भोगवटादार असलेले सराई मार्केट येथील गाळा सील करण्यात आला आहे. या दुकानावर मागील ९ वर्षांपासुन ८५ हजार रुपये कर थकीत होता,मात्र वारंवार नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने या गाळ्यावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली.

   मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येऊ शकतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये