बाजार वॉर्ड येथील दुर्गा माता मंदिरात चोरी
पोलिसांची कार्यवाही : चार तासात आरोपीस अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पोलिस ठाण्याअंतर्गत भद्रावती येथील बाजार वॉर्डातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुर्गा माता मंदिरात दानपेटी फोडून आतील रक्कम चोरून नेली.
दिनांक २७ च्या रात्री नित्य नियमाने मंदिरातील पुजाऱ्याने मंदिर बंद केले. दिनांक २८ रोजी सकाळी दैनिक वेळेनुसार मंदिर उघडले असता आतील दानपेटी फोडून रक्कम लपास झाल्याचे आढळून आले. चोरी झाल्याचे निदर्शनात येताच फिर्यादी राजेश गोपीनाथ दास यांचे फिर्यादीवरून पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक.४२५/२०२६कलम ३३१(४) ३०५ (अ) बी. एन. एस.२०२३ अन्वये गुन्ह्याची नोंद करून तपासाची चक्रे फिरविलीअसता सबंधित चोरी झाडे प्लॉट येथील शुभम विठ्ठल झाडे वय. ३१ वर्ष याने केली असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर आरोपीकडून एक लोखंडी रॉड व रोख ४१०० रुपये हस्तगत करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,मुमुक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा संतोष बाकल, तसेच पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भद्रावती येथील गुन्हे शोध पथकातील GPSI गजानन तुपकर, पोहावा जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, पो. अं. योगेश घाटोळे, संतोष राठोड, खुशाल कावडे यांनी केली.



