ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्तव्यनिष्ठ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस दलात आपली प्रदीर्घ आणि कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून वयानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी यांचा सत्कार सोहळा नुकताच पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात पार पडला.

प्रमुख उपस्थिती व सत्कार:

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी सेवानिवृत्तांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.

सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार:

१) श्री. नारायण आर. कुंभलवार (ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्धा) – ३७ वर्षे सेवा.

२) श्री. धर्मपाल शंकरराव मानकर (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पुलगाव) – ३५ वर्षे सेवा.

पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन:

याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “पोलीस सेवा ही आव्हानात्मक असते. या प्रवासात कुटुंब आणि कर्तव्याची सांगड घालत तुम्ही दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. पोलीस दलातील शिस्त आणि जनसेवेचा वारसा तुम्ही समर्थपणे पेलला आहे.” त्यांनी सर्व निवृत्त अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवर:

आज जिल्हा गुन्हे आढावा बैठक (Crime Meeting) असल्याने जिल्हयातील सर्व वरिष्ठ अधिकारी मुख्यालयात उपस्थित होते. या सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये