ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12/02/2026 रोजी फिर्यादी नामे पांडुरंग उत्तमराव डफरे, वय 52 वर्ष, रा. वार्ड क्रमांक 3 भिडी, ता. देवळी, जिल्हा – वर्धा यांना त्यांच्या गावातील राकेश वागन्ना व इतर अनोळखी इसमांनी मौजा भिडी येथील जाणाऱ्या हायवे लगत सर्व्हिस रोड वरील अतिक्रमण का उठवलं या कारणावरून फिर्यादीस हाता भुक्क्याने व काठीने मारहाण व शिवीगाळ करून पैशाची मागणी केली अश्या फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन देवळी येथे अप क्र.114/26 कलम 140(2),140(3),118(1),115(2),351(2),351(3),352,3(5) BNS नोंद करून तपासावर आहे.

दिनांक 26/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास व अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असता, बातमीदाराकडून माहिती मिळाली की कळंब, जिल्हा – यवतमाळ येथील हिरा कोहचाडे, अमोल आखाडे,वैभव निखाडे, शुभम सावरकर हे घटने पासून मौजा कळंब येथून पसार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली व ते आज रोजी ओळख लपवण्याकरिता पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारची नंबर प्लेट काढून डिकी मध्ये लपवून पांढऱ्या रंगाच्या बिना क्रमांकाच्या क्रेटा चार चाकी गाडीने समृद्धी मार्गाने गोवा येथे जात आहे अशा गोपनीय माहिती वरून समृद्धी महामार्ग वरील टोल प्लाजा वरून नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या क्रेटा गाडी बाबत माहिती घेतली असता शिवनी टोल प्लाजा जिल्हा – अमरावती येथील टोल प्लाजा वरून एक नंबर नसलेले होंडाई कंपनीची क्रेटा चारचाकी कार समृद्धी महामार्गावर चढल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक आरोपी जात असलेल्या पांढऱ्या रंगाचे विना क्रमांकाचे क्रेटा गाडीने गोवा येथे पळून जात असताना कारंजा (लाड) ते मुर्तीजापुर रोडवर आरोपी हे उभे दिसल्याने सापळा रचून त्यांच्याकडे जात असता आरोपीतांना पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफिने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव, गाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव 1) हिरा कोहचाडे, वय 28 वर्ष, रा. गांधी चौक कळंब ता. कळंब, जिल्हा यवतमाळ, 2) अमोल आखाडे, वय 32 वर्ष, रा. वाके लेआउट कळम ता. कळंब, 3) वैभव दिपक निखाडे, वय 29 वर्ष, रा. हलबिपुर, कळंब ता. कळंब, 4) शुभम विठ्ठल सावरकर, वय 28 वर्ष, रा. केवटे लेआउट कळम ता. कळंब, जिल्हा यवतमाळ यांना निष्पन्न करून सदर आरोपी त्यांना गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता सदर गुन्हा करते वेळी राकेश वागन्ना, रा. भिडी, ता. देवळी जिल्हा वर्धा व बादल थुल रा दूरगडा यांच्यासह केल्याचे सांगितले. आरोपी 1) हिरा कोहचाडे, वय 28 वर्ष, रा. गांधी चौक कळंब ता. कळंब, जिल्हा यवतमाळ, 2) अमोल आखाडे, वय 32 वर्ष, रा. वाके लेआउट कळम ता. कळंब, 3) वैभव दिपक निखाडे, वय 29 वर्ष, रा. हलबिपुर, कळंब ता. कळंब, 4) शुभम विठ्ठल सावरकर, वय 28 वर्ष, रा. केवटे लेआउट कळम ता. कळंब, जिल्हा यवतमाळ यांची पंचासमक्ष अंगझडती घेऊन त्यांच्या अंगझेडतीतून व ताब्यतुन 1) पांढऱ्या रंगाचे विना क्रमांकाची पळून जाण्यासाठी वापरलेली क्रेटा गाडी कि. 10,00,000/- रु., 2) नगदी 53,980/- रु. व 8 मोबाईल कि. 2,36,000/- रु. असा एकूण 12,89,980/- रु. चा मुद्देमाल जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त केला. आरोपी 1) हिरा कोहचाडे, वय 28 वर्ष, रा. गांधी चौक कळंब ता. कळंब, जिल्हा यवतमाळ, 2) अमोल आखाडे, वय 32 वर्ष, रा. वाके लेआउट कळम ता. कळंब, 3) वैभव दिपक निखाडे, वय 29 वर्ष, रा. हलबिपुर, कळंब ता. कळंब, 4) शुभम विठ्ठल सावरकर, वय 28 वर्ष, रा. केवटे लेआउट कळम ता. कळंब, जिल्हा यवतमाळ जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन देवळी यांचे ताब्यात देण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन देवळी करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, मा. श्री अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा. श्री विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पो. उपनि विजयसिंग गोमलाडू, स. फौ. मनोज धात्रक, पो. हवा. हमीद शेख, पो. हवा. महादेव सानप पो. हवा. दिनेश बोथकर पो. हवा. गोविंद मुंडे, पो. शि.विनोद कापसे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये