Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सोयी सुविधा उपलब्ध होईस्तोवर पाल्यांना शाळेत पाठविणार नाही

पालक सभेत पालकांचा निर्णय ; पारडी येथील विषबाधा प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोयी सुविधांचा अभाव असल्याने पालकांनी जोपर्यंत शाळेत सोयी सुविधा निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा ठराव (दि. 12) रोजी घेतला असल्याने शिक्षण विभागात खडबळ उडाली आहे. तर समस्याचे निवेदन सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

पारडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 4 डिसेंबर रोजी पोषण आहारांतर्गत माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना चना पुलाव व मोड आलेले चणे देण्यात आले होते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी सुखरुप घरी पोहचले परंतु मध्यरात्री नंतर काही विद्यार्थ्यांना हगवण, उलटया होवून प्रकृती बिघडत असल्याने पालकांनी पाल्यांना दवाखान्यात घेवून गेले तर उर्वरीत विद्यार्थी हे दुसऱ्या दिवशी शाळेत आले. परंतु त्यांनाही वरील त्रास जाणवु लागल्याने सावली, चंद्रपूर, गडचिरोली, मुल येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यात 106 विद्यार्थ्यांचा समावेश होता. सध्या स्थितीत त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असुन सर्व विद्यार्थी दवाखान्यातुन परत आले आहेत.

शाळेच्या इमारती जिर्ण झाल्याने 131 विद्यार्थ्यांकरीता नविन सुसज्ज इमारत बांधण्यात यावे, शाळेतील मुला मुलीकरीता स्वतंत्र शौचालय व मुत्रीघराची व्यवस्था करण्यात यावी, विद्यार्थ्यांना शुध्द पाण्यासाठी जलशुध्दीकरण यंत्र बसविण्यात यावे, शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिंडांगणाची सोय करण्यात यावी, शाळेतील पोषण आहार शिजवु देणार नाही, आम्ही आमच्या पाल्यांच्या जेवनाची सोयी स्वत: करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी यांचेकडे देण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, छाया शेंडे, मुर्लीधर महाराज, रवी गेडेकर, अनिल फाले, आशा उमाजी पाल, हेमंत वाघरे, अमोल भोयर, रेकचंद फाले, वेणुदास नरुले, सोनी नरुले, जोत्सना नरुले, अर्चना नरुले, पोर्णीमा ठाकुर, मनिषा पोटे आदि पालक उपस्थित होते.

         पारडी येथील जिल्हा परिषद शाळेतील घडलेले प्रकरण गंभीर असुन बाधीत विद्यार्थ्यांच्या हगवण उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. निवेदनाची दखल घेवून काही समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

मधुकर वासनिक, गटविकास अधिकारी पं.स. सावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये