ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशाचे केवळ नागरिकच नाही तर मालक बना, राजवैभव 

संविधानाची प्रास्ताविका - व्याख्यान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘आपण देशाचे नागरिक या नात्याने संविधानाची प्रास्ताविका समजावून घेऊन त्या प्रमाणे आपले आचरण अंमलात आणले पाहीजेत. समाजात चालू असलेल्या समस्यांवर तरूणांनी लक्ष केंद्रित करून चूक होत असेल तेथे किंवा अन्याय होत असेल तिथे परखडपणे बोलणे शिकलो पाहीजे. आपल्या संविधानाने आपल्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत म्हणून केवळ नागरिक म्हणून नव्हे तर देशाचे मालक बना’, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. सभागृहात आयोजित ‘संविधान – काल, आज आणि उद्या’ या विषयावर संपन्न झालेल्या व्याख्यानात संविधान समितीचे राज्य सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी 1 जुलै रोजी केले.

मोहनबाबू अग्रवाल यांच्या जन्म दिवसानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक तथा उद्योजक मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूरचे राजवैभव शोभा रामचंद्र, पुण्याच्या म.अ.नि.स.च्या शितल भोसले, सहकार्यवाह सारिका डेहनकर, जेष्ठ प्राध्यापक डाॅ. प्रभाकर ढाले, म.अ.नि.स.चे राज्य सचिव गजेंद्र सुरकार, माजी प्राचार्य डॉ. गणेश मालधुरे, माजी प्राध्यापक केशव कुवारे व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात तरूणांसोबत संवाद साधताना राजवैभव म्हणाले संविधानाच्या प्रास्तविकेतील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य या शब्दांचा अर्थ समजावून घेऊन त्यावर कार्य करणे शिकले पाहिजेत तर अध्यक्षस्थानी बोलताना मोहनबाबू अग्रवाल म्हणाले संविधान प्रास्ताविकेचा अर्थ सोप्या भाषेत समजावून देऊन नागरिकत्वाची जबाबदारी तरूणांना समजली तर अफलातून बदल आपल्या समाजात घडून येवू शकतो.

प्रा. डाॅ. ढाले म्हणाले युवावर्गाला संविधान समजल्यास आदर्श नागरिक घडविण्यात फार कार्य होवू शकते तर गजेंद्र सुरकार म्हणाले देश आणि आपण यांना जोडणारा दुवा म्हणजे संविधान होय.

कार्यक्रमाचे संचालन एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर आभार प्रा. जगदीश यावले यांनी केले. यशस्वीतेकरीता आदर्श नाईक, आदित्य तामगाडगे, मनोज नेहारे, साहील रामगडे, सुप्रिया यादव, श्रद्धा मडावी, खुशी पचारे, अभिषेक नेहारे, रितेश बुटे व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व एन.सी.सी.छात्र सैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये