Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रामधून व स्वच्छता अभियानाने श्री संत झिंगुजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

             रामधून तथा स्वच्छता अभियान राबवित शहरातील झिंगुजी महाराज मठात दिनांक सात पासून श्री संत झिंगुजी महाराज यांच्या तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रामधून झाल्यानंतर परिसरातील सर्व भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 11 वाजता मठात दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाच्या निमित्ताने झिंगुजी महाराज मठात घटस्थापना,भजन संध्या, जागृती भजन ,कीर्तन, दहीहंडी, रांगोळी स्पर्धा, सत्कार समारंभ आदी विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ ला दुपारी १.३० वाजता मठातून श्री संत झिंगुजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शेवटी गोपालकाला व महाप्रसादाने सदर सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये